Monday, October 27, 2014

पाऊस गेल्यावर...

पाऊस संपलाय आता!

ऑक्टोबर हिट वाढून आता महिना सरत ही आलाय...

अचानक गेले तीन दिवस मळभ दाटून आलंय…सूर्यदेवाचा मागमूस नाही कुठेच दिवसभर या तीन ही दिवसांत…

कुठेसा पाऊस पुन्हा पडू पाहतोय... वातावरणात अचानक बदल घडू पाहतोय...थंड वारे वाहू पाहतायेत...

आता एकीकडे हवीहवीशी वाटणारी आल्हाददायक गार वा-याची ती झुळूक आणि दुसरीकडे ऊन नसल्यामुळे नकोशी वाटणारी गळल्यागत झालेली अवस्था…

मुंबईकर असे नेहमी कात्रीत सापडतात.

मग विचार येतो, कसे राहतात रे आपले उत्तरेकडील बांधव, थंडीच्या मौसमात ?… थंडीत ऊन म्हणजे प्राण कसा? हे त्यांना जास्त ठाऊक...

इथे तर अजून सुरूही नाही झालेली, तर आत्ताच आमची ही अवस्था…

म्हणून मग हल्लीचे प्रचलित वाक्यप्रचार इथे वापरावेसे वाटतात;-

"अर्रे कुठे नेवून ठेवलाय निसर्ग माझा"

पण मग वाटतं, मनात आणलं तर
"होय! हे शक्य आहे"...

आपण साध्या गोष्टी अंगिकारून सुद्धा निसर्गाची घसरत चाललेली पत, निदान पूर्वपदावर नाही, पण किमान सुधारू मात्र नक्कीच शकतो.

चला संकल्प करूया.

"निसर्ग आपला सजवूया, निसर्गाचं संवर्धन करू या"...

-- केदार विलास दिवेकर

2 comments:

  1. निसर्ग आपला सजवूया, निसर्गाचं संवर्धन करू या...

    ReplyDelete
  2. निसर्गाचे संवर्धन करुया..

    ReplyDelete