किती "प्रेमळ सोज्वळता" भरली आहे बघा या शब्दांत…
- जबसे तेरे नैनाss, मे-- रे नैनोसेsss लाsगे रेss
जबसे दिवानाs हुआ, सबसे बेगाs ना हुआ
"रब" भी दिवाsना लागे रेsss...
रब भी दिवाsना लागे रेss … हे हे हे हे हे …
जबसे दिवानाs हुआ, सबसे बेगाs ना हुआ
"रब" भी दिवाsना लागे रेsss...
रब भी दिवाsना लागे रेss … हे हे हे हे हे …
पण प्रत्यक्षात काय चाललंय आजूबाजूला ? भावनांचा उच्छाद, नंगा नाच … Let us Chill Baby म्हणत बेबीला बाबा किंवा बाबाला बेबी कुठे घेऊन जाते आणि काय करतात ते ? हे त्या "रब" लाच ठाऊक !…
खरं प्रेम काय हो ? कुणी विचारलं तर फार कमी सांगू शकतील ! … सांगतील ही… पण तेच जगून दाखवायला सांगितलं तर ?… नाही ! जमणार नाही, अशातला भाग नाही, पण ते शेवटपर्यंत निभावतील तर ते खरं… नाहीतर तो संकल्पच जो अकल्पित केला जातो आणि कधी मोडला जातो याची कल्पनाच नसते अशांना…
"प्राप्तेषु षोडशे वर्षे, पुत्रे मित्रम वदाचरेत" असं पूर्वी म्हटलं जायचं… त्यात गहीरार्थही होता… बाल्यावस्थेतून पौगंडावस्थेत मुलं यायची… त्या काळी असं म्हटलं जायचं… पण आता तसं नाही…
ही पौगंड अवस्था फार लवकर आपली मूळे या मुलांत रुजवू पाहतेय…
अगदी घरच्या रस्त्यापांसून शाळेच्या रस्त्यांपर्यंत सर्वकडे लक्ष पालकांनी ठेवावं अशी अपेक्षा करणे म्हणजे फारच होईल !
"नैतिक मूल्य" हे विषयापुरतंच मर्यादित राहिलंय शाळेत… नैतिकता शिक्षक तरी कुठे पाळताना दिसतात आजकाल ?
बरं मुलांना काही माहिती सांगायला जावी तर त्या बाबतीत ते तुमच्या वरताण ! अशी माहिती सांगतील जी तुम्हांसही नवीन असेल… इंटरनेटच्या अलिबाबाची गुहा त्यांना सहजच उपलब्ध आहे पण ती गुहा कधी चोखळायची याचं मात्र ताळ तंत्र पालकांनी त्यांचं त्यांनीच अवगत करायला हवंय, नाहीत काही खरं नाही बाबा या मुलांच्या विचारांच्या मूळाचं…
सर्व काही फास्ट मिळू लागलंय अगदी नको ते संबंध ही… "पैसा फेक तमाशा देख, नाचेगी पिंकी फूल टू लेट" म्हणत जीवनफूल कधी कोमेजून जातं हे नं कळण्या इतपत आपण Fool होऊन जातो हे उमजून सुद्धा समजण्याची तयारी नाही आजच्या पिढीत, असं प्रामुख्यानं दिसून येत आहे…
धीन्च्याक धीन्च्याक तर करूनही मोकळी होतात हि मुलं… वयं काय म्हणावी तर थेट शाळेपासून पाढा सुरू होतो आशयांच्या संख्येचा… आणि हा पाढा आपल्याला नको यावा हीच देवाकडे प्रार्थना…
"जो होगा देखा जायेगा, अभी तो ऐश करले" ही प्रवृत्ती फार वाढत चालली आहे… बरं काही सांगायला जावं तर "जियो और जिssने दो" असं उत्तर मिळतं… हे वाक्य ऐकलं होतं पण हि मुलं त्याचा त्यांना हवा तसा असा हा अर्थ काढतील हे कोडं उलगडलं नसतं हे नक्की !
आपण खुशाल म्हणतो "बालपण देगा देवा"… अगदी गातो ही… 'Give me Sunshine, Give me some Rain, Give me another Chance, i want to Grow up once again'...
पण ?… बालपण आजकाल असतं कुठे ? आधी शाळा मग चित्र विचित्र क्लासेस मग वेगवेगळ्या स्पर्धांची पालकांनाच खुणावणारी प्रलोभनं… बिच्चारी कोवळी मुलं लहान वयातच आपली कोवळीकता हरवून बसतात… मोठ्यांचे नको ते गुण, वाण सर्व अंगिकारतात आणि मग अशा पालकांनी समाजाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?
औत्सुक्यता काय असते? याचा ही साधा संयम राहिलेला नाही आजकाल ! मग ते मोठे असोत अथवा लहान…
असो….
तुमचं काय म्हणणे आहे ?
-- केदार विलास दिवेकर
+91-9920577802
-- केदार विलास दिवेकर
+91-9920577802
No comments:
Post a Comment