जनप्रवास
Sunday, January 24, 2016
आजची पिढी बेजबाबदार आहे का ?
Sunday, January 4, 2015
पौगंड उवाच…
किती "प्रेमळ सोज्वळता" भरली आहे बघा या शब्दांत…
जबसे दिवानाs हुआ, सबसे बेगाs ना हुआ
"रब" भी दिवाsना लागे रेsss...
रब भी दिवाsना लागे रेss … हे हे हे हे हे …
पण प्रत्यक्षात काय चाललंय आजूबाजूला ? भावनांचा उच्छाद, नंगा नाच … Let us Chill Baby म्हणत बेबीला बाबा किंवा बाबाला बेबी कुठे घेऊन जाते आणि काय करतात ते ? हे त्या "रब" लाच ठाऊक !…
खरं प्रेम काय हो ? कुणी विचारलं तर फार कमी सांगू शकतील ! … सांगतील ही… पण तेच जगून दाखवायला सांगितलं तर ?… नाही ! जमणार नाही, अशातला भाग नाही, पण ते शेवटपर्यंत निभावतील तर ते खरं… नाहीतर तो संकल्पच जो अकल्पित केला जातो आणि कधी मोडला जातो याची कल्पनाच नसते अशांना…
"प्राप्तेषु षोडशे वर्षे, पुत्रे मित्रम वदाचरेत" असं पूर्वी म्हटलं जायचं… त्यात गहीरार्थही होता… बाल्यावस्थेतून पौगंडावस्थेत मुलं यायची… त्या काळी असं म्हटलं जायचं… पण आता तसं नाही…
ही पौगंड अवस्था फार लवकर आपली मूळे या मुलांत रुजवू पाहतेय…
अगदी घरच्या रस्त्यापांसून शाळेच्या रस्त्यांपर्यंत सर्वकडे लक्ष पालकांनी ठेवावं अशी अपेक्षा करणे म्हणजे फारच होईल !
"नैतिक मूल्य" हे विषयापुरतंच मर्यादित राहिलंय शाळेत… नैतिकता शिक्षक तरी कुठे पाळताना दिसतात आजकाल ?
बरं मुलांना काही माहिती सांगायला जावी तर त्या बाबतीत ते तुमच्या वरताण ! अशी माहिती सांगतील जी तुम्हांसही नवीन असेल… इंटरनेटच्या अलिबाबाची गुहा त्यांना सहजच उपलब्ध आहे पण ती गुहा कधी चोखळायची याचं मात्र ताळ तंत्र पालकांनी त्यांचं त्यांनीच अवगत करायला हवंय, नाहीत काही खरं नाही बाबा या मुलांच्या विचारांच्या मूळाचं…
सर्व काही फास्ट मिळू लागलंय अगदी नको ते संबंध ही… "पैसा फेक तमाशा देख, नाचेगी पिंकी फूल टू लेट" म्हणत जीवनफूल कधी कोमेजून जातं हे नं कळण्या इतपत आपण Fool होऊन जातो हे उमजून सुद्धा समजण्याची तयारी नाही आजच्या पिढीत, असं प्रामुख्यानं दिसून येत आहे…
धीन्च्याक धीन्च्याक तर करूनही मोकळी होतात हि मुलं… वयं काय म्हणावी तर थेट शाळेपासून पाढा सुरू होतो आशयांच्या संख्येचा… आणि हा पाढा आपल्याला नको यावा हीच देवाकडे प्रार्थना…
"जो होगा देखा जायेगा, अभी तो ऐश करले" ही प्रवृत्ती फार वाढत चालली आहे… बरं काही सांगायला जावं तर "जियो और जिssने दो" असं उत्तर मिळतं… हे वाक्य ऐकलं होतं पण हि मुलं त्याचा त्यांना हवा तसा असा हा अर्थ काढतील हे कोडं उलगडलं नसतं हे नक्की !
आपण खुशाल म्हणतो "बालपण देगा देवा"… अगदी गातो ही… 'Give me Sunshine, Give me some Rain, Give me another Chance, i want to Grow up once again'...
पण ?… बालपण आजकाल असतं कुठे ? आधी शाळा मग चित्र विचित्र क्लासेस मग वेगवेगळ्या स्पर्धांची पालकांनाच खुणावणारी प्रलोभनं… बिच्चारी कोवळी मुलं लहान वयातच आपली कोवळीकता हरवून बसतात… मोठ्यांचे नको ते गुण, वाण सर्व अंगिकारतात आणि मग अशा पालकांनी समाजाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?
औत्सुक्यता काय असते? याचा ही साधा संयम राहिलेला नाही आजकाल ! मग ते मोठे असोत अथवा लहान…
असो….
-- केदार विलास दिवेकर
+91-9920577802
Monday, October 27, 2014
पाऊस गेल्यावर...
पाऊस संपलाय आता!
ऑक्टोबर हिट वाढून आता महिना सरत ही आलाय...
अचानक गेले तीन दिवस मळभ दाटून आलंय…सूर्यदेवाचा मागमूस नाही कुठेच दिवसभर या तीन ही दिवसांत…
कुठेसा पाऊस पुन्हा पडू पाहतोय... वातावरणात अचानक बदल घडू पाहतोय...थंड वारे वाहू पाहतायेत...
आता एकीकडे हवीहवीशी वाटणारी आल्हाददायक गार वा-याची ती झुळूक आणि दुसरीकडे ऊन नसल्यामुळे नकोशी वाटणारी गळल्यागत झालेली अवस्था…
मुंबईकर असे नेहमी कात्रीत सापडतात.
मग विचार येतो, कसे राहतात रे आपले उत्तरेकडील बांधव, थंडीच्या मौसमात ?… थंडीत ऊन म्हणजे प्राण कसा? हे त्यांना जास्त ठाऊक...
इथे तर अजून सुरूही नाही झालेली, तर आत्ताच आमची ही अवस्था…
म्हणून मग हल्लीचे प्रचलित वाक्यप्रचार इथे वापरावेसे वाटतात;-
"अर्रे कुठे नेवून ठेवलाय निसर्ग माझा"
पण मग वाटतं, मनात आणलं तर
"होय! हे शक्य आहे"...
आपण साध्या गोष्टी अंगिकारून सुद्धा निसर्गाची घसरत चाललेली पत, निदान पूर्वपदावर नाही, पण किमान सुधारू मात्र नक्कीच शकतो.
चला संकल्प करूया.
"निसर्ग आपला सजवूया, निसर्गाचं संवर्धन करू या"...
-- केदार विलास दिवेकर
Saturday, September 29, 2012
लोकल पारायण
+91-9920-577-802
Saturday, September 22, 2012
बाप्पा मोरया रे
गणेश चतुर्थी जवळ आली की सर्व वातावरण कसं आनंदाने भरून जातं. सगळीकडे ही लगबग सुरु होते पहा. मग सर्वांना मनापासून म्हणावसं वाटत, "आला पहा माझा तो श्री गणेशा, सा-यांचा तारणहार तूच प्रथमेशा; चाहूल लागली तुझी गजवदना, लगबग झाली सुरु तुझ्या रे स्वागता".
(सौजन्य: "आमोद - एक आनंद कल्लोळ", के डी.)
मग मखरापासून सुरुवात ते अगदी सजावटीतल्या एखाद्या डोंगराच्या शिखरापर्यंत, नुसता आनंदाचा कल्लोळ माजतो, हें पाहून सुखद वाटत. देवासाठी काय करू अन काय काय करू, असं सर्व गृहिणींना वाटत. अगदी मनापासून सर्व तयारी, नैवेद्य अगदी मनोभावे, भक्तिभावे बाप्पास अर्पिला जातो. लहानांसाठी तर ही पर्वणीच. सर्वकाही त्यांच्यासाठी नवीन असतं म्हणा ते. मग आजी-आजोबांकडून गणेशाच्या कहाण्या सांगितल्या जातात त्यांना. विशेषत: गणेश आणि कार्तिकेयाची (त्या निमित्ताने का होईना आई-वडिलांबद्दल आदर असावा, हें त्या लहानग्यांना तेव्हापासूनच बिंबवलं जातं. धन्य ते संस्कार.) पण आजकाल तो आदर असून उपयोग नाही, तो टिकवून नित्य आचरणात आणणे हाच एक गरजेचा संस्कार हवा आहे आजच्या पिढीला... असो..
सर्वश्रुत आहे की टिळकांनी "गणेशोत्सव" का सुरु केला ते ? अगदी शाळेपासून ही चिमुरडी मुलं वाचत आलीयेत म्हणा (तुम्ही आम्ही चिमुरडी होतोच की.. नाही का.. ). चला तुम्ही सांगा पाहू का ते ? (नाही नाही... तुमचं जनरल नॉलेज नाही 'चेक' करायचंय इथे).. सांगाना... का केला असेल बुवा त्यांनी सुरु हा "गणेशोत्सव".......
चला मी पुन्हा इथे सांगतो.... कारण तशी हल्ली सारखी पाळी येते अशा गोष्टी परत परत सांगण्याची. काय करणार म्हणा. आजकालची पिढी ती. असो... कान नाही पिळायचा तुमचा. तर सर्व माणसांनी एकत्र यावं, मिळून मिसळून हा सण साजरा करावा, हा त्यामागचा उद्देश.
(खरी कहाणी तर कित्येकांना माहीत नाहीये, की गणेश उत्सव फार पूर्वीपासून अगदी शिवाजी महाराज - पेशव्यांच्या काळापासून चालत आलाय. पण तो फक्त त्या घराण्यापुरता मर्यादित होता, साधारणपणे १८१८-१८९२ दरम्यान. टिळकांनी पाहिलं होतं की कशी या आराध्य दैवताची पूजा केली जाते. मग त्यांनी ठरवलं १८९३ साली की हा गणेशोत्सव नुसता ब्राह्मणांसाठीच मर्यादित ठेवायचा नाही, सर्वांना त्याचा मान मिळावा. लोकांनी एकत्र यावा, की जेणे करून एकमेकांना ओळखता येईल, जाणता येईल. त्यांच्यातली एकी वाढण्यास मदत होईल. ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड पुकारायला माणसं एकत्र येण गरजेच जे होतं तेव्हा).
सर्वत्र गणेशोत्सवाची नांदी आजकाल पाहायला मिळते. गावांकडे जाण्यासाठी लोकांची जय्यत तयारी सुरु होते मग. ती अगदी चार महिने आधीपासून. का तर अहो आजकाल रेल्वेचं आरक्षण नाही ना सहजी मिळत. मग यांचा साहेबांच्या मागे तगादा सुरु. हें पहा साहेब, "आपल्याला गणेश चतुर्थी साठी रजा पाहिजेलय. या वर्षी आमच्या चुलात्याक.. कडे गणेशाची मूर्ती येवाक असा. मग मला जायला पाहिजेलय. गणेशाच तिथे पाहणार कोण हो !"... साहेबांना हें माहीत असतं, की दरवर्षी ठरल्याप्रमाणे हा कोकणी माणूस न चुकता जाणारच. तोही हो म्हणतो.
इथे शहरातही लोकांकडे आजकाल गणेश मूर्ती येते. अगदीच काही नाही तर "दीड दिवसांसाठी" तरी येतेच. मग हें म्हटल्यावर त्यांच्याही रजा आल्याच की, निदान चार दिवसांसाठी तरी.. (दोन दिवस तयारीसाठी आणि दीड दिवस गणपतीसाठी, अर्धा दिवस नुसता असाच संपून जातो). आमच्याकडे साहेब यंदा गणपती आहे, तुम्ही सह-कुटुंब याच हो (या मागचा उद्देश निर्मळ नसतो हो पण... कशासाठी ते तुम्हीच समजून घ्या.. बाकी आपण सुज्ञ आहातच). बऱ, सर्वांना इमेल करून अगदी घरचा पत्ता देऊन बोलावणं धाडल जातं खास. (फोन करायला वेळ आहे कुणाला आणि पैसेही कशाला खर्च, फुकटात जर काम होतंय तर...). लोक दर्शनासाठी कमी तुमचं घर बघण्यासाठी येतात, आणि त्यावर खुसफुसत बसतात. बऱ आम्हीही शहाणे, आमची सजावट पहा कशी मस्त जमलीये हें सांगण्याच्या मागे त्यांच्या. बाप्पाला पहा, काय तेज आलंय नाही त्या दिव्यांच्या आरासामुळे....आता या शहाण्यांना काय म्हणाव, अरे जया तेजाने तुम्हा निर्मिले, तया तुमचे कृत्रिम तेज काय ते !! .. असो..
श्रावण कसाबसा यांनी पाळला हो... ... दुस-या दिवशी लगेच यांची उडी तिथे.... आता कुठे ते तुम्हा आम्हाला माहीतच आहे. तर सांगायचा मुद्दा हा की भाद्रपद सुरु झाला की गणेशाचं आगमन होत ना, (गणेशोत्सव मराठी महिन्याच्या "भाद्रपद" महिन्यात साजरा करत्तात म्हटलं, नाही काय आहे आमची मुलं कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली ना.. मराठी महिने काय असतात ते उकल करून सांगावं लागतं), मग यांचं तेव्हा मटण-चिकन चा आणि सोमरसाचा उपवास असतो म्हणे.... ना...
असं सर्व करता करता, सर्व घडत असलेलं गणेश उत्सवाचं आसपासचं स्वरूप पाहता पाहता, अनंत चतुर्दशी येते की हो.... (या दरम्यानच्या काळातल्या कित्येक घडामोडी, अगदी विवरण करून, सांगण्यासारख्या आहेत, पण उगाच इथे फाफट पसारा नको इथे म्हणून आवर घालतो, बाकी सर्वश्रुत, याची देही याची डोळा सर्वांनी अनुभवल आहेच की, आणि अनुभव करत राहणार यात तिळमात्र शंका नाही.
"मन मारावे परी वासना उरी उरावे", अशी काहीशी आजकाल लोकांची अवस्था झाली आहे.
मला रोज मटण-चिकन लागतच म्हणे ?
पण आपली बाप्पावरची भक्ती 'शोल्लीड' आहे (Solid - असा अर्थ घ्यावा), असे हें म्हणतात बुवा काहीसे. अपुन काही बी खात नाही (पीत तर नाहीच नाही) कित्तीबी मनात असला तरी.. (तम्बुमागे फक्त जाऊन बघा एखाद्या मंडळाच्या, नुसत्या खाण्या-पिण्यावरच्या वासनेचा नाच पाहायला मिळतो).. अहो बाप्पाच अजून तिथे लोकांनी विसर्जनही केला नाहीये ओ sssssss . :(
असो.... चूक भूक द्यावी घ्यावी.. कुणाच इथे मन दुखवायच तिळमात्र उद्देश नाहीये तर सद्य परिस्थिती मोजक्या शब्दात, मांडण्याचा हा अट्टाहास
-- आपला विनम्र के डी..
"बाप्पा आला रे, बाप्पा अवतरला, बाप्पा आला आला आला
स्वागता त्याच्या सुमने उधळू, उधळू उधळू चला...
पायघडी घालू, आसनंही सजवू, टिळक करूया चला. "
(सौजन्य: आमोद - एक आनंद कल्लोळ)
Sunday, September 9, 2012
उद्रेक भीषण स्फोटाचा
उद्रेक भीषण स्फोटाचा (१६-जुल-२०११)
-- पण भावनांचा कधी होणार
प्रत्येक मुंबईकराच्या मनात हा प्रश्न आणि त्याच नेहमीच 'टिपीकल' उत्तर, आता 'कॉमन' होऊ लागलं आहे. आता हें 'कॉमन' का होत चाललंय? हें तुमच्या सारख्या सुज्ञास सांगायची गरज नको. मुंबईकर खरोखरच निगरगट्ट, कोरडे, कोडगे होत चालले आहेत का ? त्यांच्या भावना मृत चालल्या किंवा मेल्या आहेत का ?
स्फोट झाला ? कुठे? कधी? कसा ?, असा आहे का, ठीक आहे. मुंबई पुन्हा लागली आपल्या कामावर दुसऱ्या दिवशी ! असे काहीसे मजकूर ऐकायला आणि वाचायला मिळतात टी.व्ही वर, वृत्तमानपत्रात.
अरेरे, पण या लोकांच्या भावना गेल्या कुठे ? त्यात भरीस पाडतात ते आपले जनसेवक, मिडियावाले ! आता काय दाखवायचं, कसं दाखवावं आणि काय झाकायच, हे त्यांनी बहुधा शिकला नसावं का ? पण इथे यांच्या खुणाच उलटया. आपल्या वाहिनीला कशी प्रसिद्धी मिळेल, सर्वोत्तम टी.आर.पी (प्रेक्षक-संख्या) मिळेल ? यातच चढाओढ. एखादा प्रसंग कसं 'एनकॅश' करायचा हेच आजकालच्या जर्नलिझम मध्ये शिकवतात, असा वाटतं. हा शब्द 'एनकॅश' मुळात घातकच आहे. बरं, ही माणसे प्रश्न तरी कसे विचारणार, तर झाल्या प्रसंगाबद्दल तुम्हाला काय वाटतं ? आता जिथे त्यांचे परिजन या हल्ल्यात म्हणा की अन्य कुठल्याही दुर्दैवी प्रसंगात, मेले आहेत. अरे, लेकांनो ती माणसे आहेत , भावना शून्य रोबोट नव्हेत, हे त्यांना कोणीतरी समजावा रे, जरी तुम्ही झाला असलात तरी.
साधा कुत्र्या, मांजराला लागलं, मारलं तर आपण लगेच प्राणीवादी बनायला तयार..मग ताबडतोब मोर्चे, निदर्शने, आजकालच्या भाषेत फेसबुक वर कार्यक्रम ठरवून कोण कोण हजार राहणार याची हजेरी घेणे इत्यादी. आता यात यांचा काय जातंय म्हणा, सोशल कॉज म्हणे. जो तो उपटcसुम्भासारखा येतो आणि प्रसिद्धीच्या मागे धावतो. अरे, यक्ष्न कोणी सांगा रे, की देवाने जो दोन पायांचा जीव निर्माण केला आहे, त्याला 'माणूस' म्हणतात, त्याच्याकडे बघा, त्याला सावर. चार पायांचे प्राणी आपोआप निसर्गाकडून सांभाळले जातात; त्यांना तसा उपजतच स्वतःच रक्षण करण्याचा दान दिल आहे.
पुढे सांगायचा झाला तर काय आजकालच्या लोकांचा फॅड आहे नवीन, जरा कुठे काही अघटीत घडला की निघाले मेणबत्त्या घेऊन. किंवा दोन मिनिट मौन वगैरे पाळून. आता मी या भावनेच्या विरुद्ध नाही, पण त्या जर तारतम्याने वापरल्या तर, अन्यथा मस्तक खवळल्याशिवाय राहत नाही. वरून, हें प्रताप यांचे एक-दोन दिवस झिंग आल्यासारखे असतात आणि काही होतंय असं वाटायच्या आत मावळतात.
पण गरजूंना साधी कोणी मदत केली आहे का ? विचारपूस तरी केली आहे का ?
मग आमच्या पुढे पुढील प्रश्न दत्त म्हणून उभे राहतात, की बाबा ! कोण लागतात हें आमचे एवढे, की आम्ही त्यांच्या बद्दल एवढा विचार करू? (आता अशा वेळी दत्त म्हणून पुढे उभे राहणे का म्हणतात ते माहीत नाही.) कोण लागतात हें आमचे? आम्ही का म्हणून मदत करू? आम्हाला याच्या मोबदल्यात काय मिळेल ? अशी ही मोठी प्रश्नावली मनात तयार. मात्र बोलून दाखवायची हिंमत कोणात नाही. कारण त्यालाही निर्भीडपणा लागतो, जो आज काहीसा मावळत चाललाय. (काही निर्लज्ज मात्र हें बोलूनही दाखवतात बर, मग अशांच्या माणुसकी विषयीचा वेगळाच प्रश्न उभा राहतो). काहींची म्हणे पत कमी होईल अशाने समाजात. अरे ! पण ह्या सोम्यांना कोण समजावणार, की ज्या लोकांचा, समाजाचा कारण पुढे करून हें अवडंबर माजवत आहेत, तो समाज त्यांना पोसायला येणार नाहीये. या समाजाला एकाचा धंदा, जुन्या-पुराण्या कुठल्यातरी परंपरा जपायच्या, ज्या काळानुरूप ओसरायला पाहिजेत. त्यांना वाटता की त्या जपल्या म्हणजे आपला "कल्याण". पण त्यांना हें माहीत नाही, हेच ते "कल्याण", त्यांना माणुसकीच्या विरुद्ध दिशेने अधोगतीकडे घेऊन चालले आहे. हें आता समाजाला उर फुटेस्तोवर सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
आता या बॉम्बस्फोटाच्या घटनेवर किती पत्र, संदेश पाठवण्यात आले, इमेल-मोबाईल वरून. वृत्तवाहिन्यांवरून चिथावणीदायक दृश्य, चित्रे सतत दाखवण्यात होती. पण हेच संदेश कितीसे असे पाठवले गेले, की त्या हल्ल्यात सापडलेल्या गरजूंना मदतीचा हात हवा आहे ?. आपणही असा विचार केला होता का, की मी माझ्यापरीने कसा हातभार लावू, मग तो खारीचाही का होईना ?. मोबाईल वरील संदेशही कसे होते, तर म्हणे "त्या दिवशी कसाबचा वाढदिवस होता, म्हणून आतंकवाद्यांनी हें स्फोट घडवून आणले, त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी", आता काय म्हणावं, अशा मंद बुद्धींना, ज्यांनी हें संदेश प्रसारित आणि पुढे त्याचे वाटप केले ! बर्थडे ब्लास्ट म्हणे ! मूर्ख लेकाचे. आपण आपल्या वाढदिवस साजरा करण्याला बर्थडे ब्लास्ट म्हणतो, अहो पण त्या लेकाच्यांनी त्याचा शब्दशः अर्थ काढला ना हो. प्रत्येक गोष्टीचा आजकाल विडंबन करण्याची सवय लागलीय लोकांना. पण म्हणून काय जनतेच्या भावनांशी हा खेळ ? आता या भावना कुठे उरत चालल्या आहेत म्हणा. अहो पण ज्यांच्यात ज्या काही भावना उरल्यात त्यांच्याबद्दल मग सहानुभूती वाटून राहते. काय तर म्हणे, स्ट्रेस नाहीसा करण्यासाठी, अहो मग पण भावना कशाशी खातात हेही कळण्याची बुद्धी उरू नये ?
बर ते सरकारच, Anti Terrorist Squad काय करताय तर, काही नाही. प्रत्येक गोष्टीचा जाब, हिशेब द्यावा लागतो म्हणे त्यांना, साध्या गोळ्या किती झाडल्या याचाही.. कीव येते त्यांची. कारण इच्छा असूनही त्यांना त्यांची कामगिरी बजावता येत नाही. मग त्या साल्या अतिरेक्यांना कितीही गोळ्या झाडू देत, पण जर ते तुमच्या तावडीत सापडले तर त्यांना ठार नाही करायचा, तर नुसत्या पायावर गोळ्या झाडायच्या म्हणे. का तर म्हणे त्यांच्या साथीदारांची नाव आपल्याला कदाचित कळू शकतील म्हणे. जिवंत हवा आहे आहे तो आम्हाला, आणि आपला कोर्टाचा कामकाज तर सर्वश्रुत आहेच, यात काही वादच नाही. देओलांचा सनी उगाच नाही भडकत, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं म्हणत.
बर या उपर, काहींनी मदतीचा आवाहन केला तरी हा समाज आहेच वर बोलायला, की आम्ही का म्हणून, शासनाचा काम आहे ते. अहो पण शासनाच्या कामाचा वेग सर्वांस श्रुत आहे, आधी चौकशी समिती नेमली जाणार (तीही उच्चस्तरीय बर का ?) मग अहवाल मांडला जाणार, आणि मग काय...... तो अहवाल बासनात, नाही का ...
गोर गरिबांना, गरजू पीडितांना मदत करा, असं उपदेश मी नाही करणार इथे, हें ज्याचा त्याने समजायला हव. आणि हो, जर का केलात, तर अशा गोष्टींचा उहापोह करून त्या केलेल्या दानाच अवडंबर तरी माजवू नका म्हणजे मिळवलं. कारण केलेलं दान हें अशा रीतीने वाया जात त्या दात्याच्या दरबारात. त्याचा रंगच उडून जातो. एक आत्मिक समाधान जी मिळते ते मग नाही मिळत.
बघा बार प्रयत्न करून तुम्ही आजपासून.. छान वाटत. एका जाहिरातीत ऐकला आहे, "करके देखो, अच्छा लगता हें"
उद्रेक भीषण स्फोटांचा झाला खरा, पण आता आपल्या भावनांचा कधी कोणार ??
इति...