माय-बाप जाणकार हो, काय विषय आहे पहा? की जिथे आजची पिढीच म्हणजे मीच आजच्या पिढीतला (वय ३३, फार नाहीये हो) आजच्या पिढीबाबत बोलणार आहे ! त्यामुळे एक Prejudice पणा येणार तर नाही न याबाबत संपूर्ण लेखभर मला सतर्क रहावं लागणार आहे.
लहानपणापासून पहात आणि ऐकत आलोय की हि हल्लीची पिढी की नै फारच वाईट होत चाललीय, आमच्या वेळी असं काही नसायचं हा. तेव्हा या वाक्यांचा अर्थ कळायचा नाही. पण जसजसा मोठा झालो तसतसं आसपासचं वातावरण पाहून आणि जुन्या पिढीचे वागणे पाहून एक मात्र कळाल कि ह्यालाच Generation Gap असं म्हणतात बुवा; कोणी काहीही म्हणा, पण काळ कुणासाठी न कधी थांबला, थांबणार आणि थांबेल. आपण बदलत्या काळानुरूप कसं स्वतःला त्या साच्यात आणि किती सहज-गतीने बसवू शकतो इथे सारा हा 'पिढी'चा खेळ आणि मेख आहे.
पण जुनी आणि नवी पिढी म्हणजे ते काय हो? काळ परिवर्तनच ना. जुनी जेव्हा नवीन होती तेव्हा त्या आधीची पिढी हि जुनी होतीच की ! त्या काळातही असेच ताशेरे जुन्या पिढीतून नवीन पिढीला ओढले जायचे. त्या नव्या पिढीलाही ते खुपायचं, पण शेवटी 'अनुभव' हा सर्वात मोठा गुरू म्हणतात ना ते काही उगाच नाही. सर्वांना 'आपल्या वागणुकीचा पाहुणचार (कर्मफळ)' म्हणजेच पेरावे ते उगवते या म्हणीप्रमाणे शेवटी त्या वरच्या परमात्म्याकडून मिळतोच आणि मग हीच जुनी झालेली नवी पिढी होऊ घातलेल्या नव्या पिढीला 'चार मोलाचे उपदेश' करायला लागते.
बरं हेतू कितीही चांगला असला त्यांचा, तरीही ते तो कसा Present करतात म्हणजे कुचकट, लागट, खोचक बोलून किंवा पोटतिडकीने?, इथेच तर खरी वरच्याने सुंदर मेख मारलीय. सुंदर अशासाठी म्हणतोय की ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं हे की त्याने तो सल्ला कसा घ्यावा. काहींना मागितला नसताना सल्ला का देताय ? ही डोकेदुखी वाटते, तर काही शांतपणे ऐकून घेतात, पण आपल्याला हवं तसंच करतात, तर काही खरंच विचार करून Follow हि करतात.
नाही म्हटलं तरी सरते शेवटी प्रत्येक पिढीचे 'गुण-दोष' असतातच. 'गुण' अशासाठी कि काळ बदलतो तशा सवयी बदलतात, राहणीमान उंचावतं, कामाचा वेग आणि आवेग दोन्ही वाढतं. कैक पटीने जग बदलत जातं आणि पिढ्या सामाजिक, आर्थिक उन्नत होत जातात; आणि 'दोष' अशासाठी 'जुना काळ जणू मागासलेला होता का? असं प्रत्येक पिढीला वाटू लागतं'. जेव्हा पूर्वीपेक्षा गोष्टी सहज उपलब्ध होतात तेव्हा त्याची किंमत माणसाला राहत नाही,नकळत मदमस्त होत जातो, यालाच 'स्वैराचार' म्हणतात.
असो ३५० शब्दांत हा पसारा मांडण केवळ अशक्य ! तरीही तो मांडायचा एक चिवट प्रयत्न…
कळावे लोभ असावा,
आपला कृपा अभिलाषी
- केदार विलास दिवेकर
६८/१, गीता को. ओ. हाउसिंग सोसायटी,
पांडुरंगवाडी, रस्ता क्र. २, गोरेगाव (पू)
मुंबई - ४०० ०६३
+९९२०५७७८०२ (P)